AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षितचं सर्वात रोमँटिक गाणं, एकदा नाही तर 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन

37 वर्षांपूर्वी माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी दिलं होतं सर्वात रोमँटिक गाणं. पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामुळे ठरलं प्रचंड सुपरहिट.

माधुरी दीक्षितचं सर्वात रोमँटिक गाणं, एकदा नाही तर 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 03, 2026 | 7:54 PM
Share

बॉलिवूडमध्ये काही रोमँटिक गाणी अशी आहेत, जी ऐकताच जुन्या आठवणी ताज्या होतात. असंच एक लोकप्रिय गाणं म्हणजे ‘आज फिर तुम पे प्यार आया है’. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दयावान’ या चित्रपटातील हे गाणं आजही संगीतप्रेमींच्या आवडीचं आहे. या गाण्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेते विनोद खन्ना यांची जोडी पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे, त्यावेळी माधुरी अवघी 21 वर्षांची होती तर विनोद खन्ना यांचं वय जवळपास 42 वर्षे होतं.

या गाण्यात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यातील रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. दोघांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीमुळे हे गाणं त्यावेळी विशेष चर्चेत आलं होतं. पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आवाजाने या गाण्याला वेगळीच उंची मिळवून दिली. आजही जुन्या रोमँटिक गाण्यांचा विषय निघाला की या गाण्याची आवर्जून आठवण काढली जाते.

काय होती ‘दयावान’ चित्रपटाची कथा?

‘दयावान’ चित्रपटाची कथा शक्ती वेलू नावाच्या तरुणाभोवती फिरते. लहानपणीच त्याच्या वडिलांची पोलिसांकडून हत्या होते. या घटनेनंतर तो मोठा झाल्यावर गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करतो. मात्र, गरीब आणि गरजू लोकांना मदत करत असल्यामुळे लोक त्याला ‘दयावान’ म्हणून ओळखू लागतात.

याच प्रवासात त्याची नीला (माधुरी दीक्षित) हिच्याशी भेट होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करतात. मात्र, गुन्हेगारी जगाशी असलेल्या संबंधांमुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. या चित्रपटात अमरीश पुरी, फिरोज खान, आदित्य पंचोली, अनुपम खेर आणि अमाला अक्किनेनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

गाण्याला मिळाली दिग्गज संगीतकारांची साथ

‘आज फिर तुम पे प्यार आया है’ हे गाणं पंकज उधास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल अजीज कैशी यांनी लिहिले असून, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं आहे. गाण्याची संथ धून, रोमँटिक शब्द आणि दोन्ही गायकांच्या आवाजातील सुरेख संगम यामुळे हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

चित्रपटाला आणि या गाण्याला आता जवळपास 38 वर्षे झाली आहेत. मात्र, ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ या गाण्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले