

निक्की तांबोळी हिने हे फोटो शेअर करताना लिहिले की, तुमच्या एक्सपेक्षा जास्त हाॅट आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मुलींपेक्षा अधिक छान...आता निक्की तांबोळी हिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.

एका युजर्सने निक्की तांबोळी हिच्या फोटोंना ट्रोल करत म्हटले की, प्लास्टिक सर्जरीची दुकान, दुसऱ्याने लिहिले की, किती जास्त प्लास्टिक सर्जरी करतेस निक्की...तिसऱ्याने लिहिले की, हिने चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी केलीये.

निक्की तांबोळी ही आता सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. काहींना निक्की तांबोळी हिचे फोटो देखील आवडले आहेत. काहींनी निक्की तांबोळी हिच्या या फोटोंची तारीफ केलीये.

निक्की तांबोळी हिचे नाव सुकेश चंदशेखर प्रकरणात आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर सुकेश चंदशेखर याला भेटण्यासाठी निक्की तांबोळी ही थेट जेलमध्ये गेली असल्याची चर्चा आहे.