
'बिग बॉस ओटीटी' स्पर्धक उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. लाइम लाइटमध्ये कसे राहायचे हे उर्फीला चांगलेच ठाऊक आहे. या कारणास्तव, ती नेहमीच असे लूक कॅरी करते, जे इंटरनेटवर चर्चेचा विषय बनतात.

अनेक वेळा तिची विचित्र फॅशन चाहत्यांना समजत नाही. यापूर्वी उर्फी जावेदच्या अनेक ड्रेसिंग सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. उर्फीला तिच्या कपड्यांवरून सतत ट्रोल केले जात आहे.

नुकतेच उर्फी जावेदने काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाचा टॉप घातलेला दिसत आहे आणि तिच्या डोळ्यांवर चष्मा देखील आहे. उर्फी जावेदचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या या नव्या फोटोंमध्ये किलर पोज देताना दिसत आहे. मात्र तिच्या या हटके फोटो पोजमुळे काही चाहते तिला ट्रोल देखील करत आहेत.

उर्फीने एका हटके अंदाजात आपली पँट पकडत फोटो पोज देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत ‘हा तर सरकलेली पँट सावरण्याचा प्रयत्न...’, असे म्हटले आहे.