
2021 हे वर्ष संपणार आहे, पण या वर्षात अनेक गोष्टी घडल्या ज्या विसरणे अशक्य आहे. या गोष्टींमध्ये सेलिब्रिटींच्या लग्नाचाही समावेश होतो. या वर्षी अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले आहेत. चला तर जाणून घेऊया...

वरुण धवन आणि त्याची बालपणीची मैत्रिण नताशा दलाल यांनी या वर्षी 24 जानेवारीला अलिबागमध्ये लग्न केले. वरुणने नताशासोबतचे नाते कधीही लपवले नव्हते.

यामी गौतम आणि आदित्य धर यांचे अफेअर ‘उरी’ चित्रपटानंतर सुरू झाले होते. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 4 जुलै 2021 रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नेहमीच त्यांचे नाते गुप्त ठेवले. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. 9 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये लग्न केले.

जवळपास दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबर 2021 रोजी लग्न केले. हे लग्न चंदिगडमध्ये कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांमध्ये पार पडले.

कोण म्हणतं प्रेम दुसऱ्यांदा होऊ शकत नाही? अगदी शक्य आहे आणि ते अभिनेत्री दिया मिर्झाने सिद्ध केले आहे. घटस्फोटानंतर दीया बराच काळ अविवाहित होती आणि त्यानंतर तिला वैभव रेखीची साथ मिळाली. वैभवसोबत दियाने 15 फेब्रुवारी 2021 रोजी सात फेरे घेतले. या दोघांचे हे दुसरे लग्न आहे.

अंकिता लोखंडेने तिचा प्रियकर विकी जैन याच्याशी 14 डिसेंबर 2021 रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केले.