Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साकारला ‘बाप्पा’, पाहा Photo
नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित गणेशमूर्ती कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली.

गणेशोत्सवाची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. आता यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाडूची मातीची मूर्ती घडवली.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंढेही यावेळी उपस्थिती होत्या. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शाडूची मातीची मूर्ती घडवली.
नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित गणेशमूर्ती कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवली.
यावेळी मुख्यमंत्र्यासोबत गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि योगेश कदमही उपस्थित होते. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित गणेशमूर्ती कार्यशाळेत ही मूर्ती घडवली गेली.
निसर्गाला हानी न पोहोचवता गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यशाळेत इको फ्रेंडली बाप्पासाठी जनजागृती करण्यात आली.