धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात निघाला साप, कर्मचाऱ्यांची पळापळ; नेमकं काय घडलं?

विशेष म्हणजे सुरक्षेसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात स्वच्छतेचीही तेवढीच काळजी घेतली जाते. परंतु नागपुरातील मुख्यमंत्री यांचं निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर एक अजब प्रकार समोर आला आहे.

| Updated on: Mar 10, 2026 | 9:21 PM
1 / 5
नागपूर - मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हटलं की कडेकोट बंदोबस्त असतो. बंगल्याच्या आजूबाजूला अनेक सुरक्षारक्षक असतात. या सुरक्षारक्षकांच्या परवानगीविना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोणीही प्रवेश करू शकत नाही.

2 / 5

विशेष म्हणजे सुरक्षेसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात स्वच्छतेचीही तेवढीच काळजी घेतली जाते. परंतु नागपुरातील मुख्यमंत्री यांचं निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर एक अजब प्रकार समोर आला आहे.

3 / 5

या बंगल्याच्या परिसरात एक साप आढळला आहे. हा साप दिसून आल्यानंतर काही काळासाठी सर्वत्र तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आढळलेला हा साप धामण प्रजातीचा होता.

4 / 5

साप आढळून आल्यावर लगेच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनी सर्पमित्रांना कॉल केला. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरून कॉल आल्यानंतर सर्पमित्रही तातडीने दाखल झाले.

5 / 5

सर्पमित्रांनी अथक प्रयत्न करून नंतर हा साप पकडला. त्यानंतर सर्पमित्रांनी हा साप नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर साप दिसून आल्याने सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us