
नुकताच भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या शोमध्ये मोठा खुलासा केलाय. टीव्ही क्षेत्रातील एक काळे सत्यच त्यांनी सांगून टाकल्याचे दिसत आहे.

मनोज वायपेयी आणि प्राची देसाई हे नुकताच त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारती आणि हर्षच्या पाॅडकास्टमध्ये पोहचले. यावेळी काही मोठे खुलासे करण्यात आले.

हर्ष म्हणाला की, अगोदर अभिनेते 15-15 घंटे सेटवर काम करत होते. त्यांचे प्रयत्न असायचे की, ते कमीत कमी झोप घेऊन काम करायचे. हेच नाही तर मी बऱ्याच वेळा हार्ट अॅटक अभिनेत्यांना आलेले देखील बघितले आहेत.

झोप कमी मिळत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतं. हेच नाही तर मी सेटवर बघितले आहे की, मालिकांमध्ये अभिनेत्री सलाईन लागूनही काम करतात.

हेच नाही तर त्यांना घरी जाण्याची परवानगी देखील नसते. कारण त्यांचा शाॅट टेलीकास्ट झालेला नसतो. डायरेक्टरला काहीच देणे घेणे नसते की, कलाकार हे कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत.