या देशात मृत्यूचाही करतात जल्लोष, फ्यूनरल पार्टी आयोजित करुन करतात लाखोंचा खर्च

मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे. पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू होतच असतात. परंतु मृत्यूला सामोरे जाण्याची हिंमत सर्वसामान्यांमध्ये नसते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळतो. परंतु जगातील एक देश असा आहे, ज्या ठिकाणी मृत्यूचा जल्लोष केला जातो. अगदी फ्यूनरल पार्टी आयोजित करुन लाखोंचा खर्च केला जातो.

| Updated on: Jul 10, 2025 | 2:38 PM
1 / 6
पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशात मृत्यूसंदर्भात वेगळीच परंपरा आहे. या ठिकाणी मृत्यूचा जल्लोष केला जातो. अगदी एखाद्या लग्नासारखा हा कार्यक्रम असतो. फ्यूनरल पार्टीचे आयोजन करुन लाखो रुपये खर्च केले जातात.

2 / 6
घानामध्ये मृत्यूचा आनंद साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. ज्या घरात मृत्यू झाला ते पार्टी देतात. चांगले कपडे परिधान करतात. नाचणे-गाणे, खाणे-पिणे असे कार्यक्रम होतात. मृत व्यक्तीचा फोटोप्रमाणे कपडे परिधान करतात.

3 / 6
मृत झालेल्या ज्या व्यक्तीच्या फ्यूनरल पार्टीत जितके जास्त सदस्य येतात तितका तो व्यक्ती मनमिळावू असल्याचे समजले जाते. लग्नापेक्षा जास्त खर्च फ्यूनरल पार्टीत केला जातो. अंतिम संस्कारात मृत व्यक्तीच्या संबंधित वेगवेगळ्या आकृत्याही तयार केल्या जातात.

4 / 6
फ्यूनरल पार्टी आयोजित करण्यामागे घानामधील लोकांचा वेगळा विचार आहे. ही परंपरा मृत व्यक्तीसाठी सकारात्मक असल्याचे त्या देशांमधील लोकांचे म्हणणे आहे. खूप टीका झाल्यानंतरही या देशातील ही परंपरा बंद झाली नाही.

5 / 6
धार्मिक आणि राजकीय लोकांकडून झालेल्या टीकेनंतरही घानाच्या लोकांनी या परंपरेत बदल केला नाही. त्यांच्या मतानुसार जन्म किंवा मृत्यू हा आनंद सारखा आहे. मृत्यूच्या आनंदाबरोबर अंत्यसंस्काराच्या विधींमध्ये रडणे आणि शोक प्रार्थनेचाही समावेश असतो. अनेक शोकाकुल कुटुंबे चर्चमध्ये सेवा करतात.

6 / 6
घानामध्ये असे म्हटले जाते की अंत्यसंस्कारात जितके जास्त लोक उपस्थित राहतात तितकेच तो अधिक मैत्रीपूर्ण, उदार आणि चांगला व्यक्ती मानला जातो. म्हणूनच शोक व्यक्त करण्यासाठी जितके जास्त लोक जमतील तितके ते चांगले मानले जाते.