
देबिना बनर्जी - टीवी एक्ट्रेस देबिना बॅनर्जीने एक्टर गुरमीत चौधरीसोबत लग्न केलय. दोघांनी वर्ष 2006 मध्ये घरातून पळून जावून लग्न केलं होतं. स्वत: गुरमीतने याचा खुलासा केलेला. सोबत काम करता करता प्रेमात पडलो अस त्याने सांगितलेलं.

सुधा चंद्रन - : छोट्या पडद्यावरची अभिनेत्री सुधा चंद्रनने सुद्धा प्रेमासाठी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतलेला. अभिनेत्रीने पती रवी डांगसोबत पळून जावून लग्न केलेलं. दोघे चित्रपटाच्या शूटिंगवेळी भेटलेले. दोघांच कुटुंब या लग्नाविरोधात होतं.

पूजा बनर्जी - पूजा बनर्जी व्यक्तीगत आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. आपल्या पहिल्या प्रेमासाठी ती वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळालेली. अरुणॉय चक्रवर्ती सोबत तिने पहिलं लग्न केलं. वर्ष 2013 मध्ये त्यांचं नातं तुटलं. 9 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला.

अर्चना पूरन सिंह - दीर्घकाळ चित्रपटात काम केल्यानंतर अर्चना पूरन सिंह आता छोट्या पडद्यावर दिसतेय. अर्चनाने स्वत: अनेकदा या गोष्टीचा खुलासा केलाय की, पती परमीत सेठीसोबत तिने पळून जावून लग्न केलय. दोघांची कुटुंब या लग्नाच्या विरोधात होती.

ईवा ग्रोवर - छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावर नशीब आजमवणारी अभिनेत्री ईवा ग्रोवरने सुद्धा पळून जाऊन लग्न केलेलं. ईवाने आमिर खानच्या सावत्र भावासोबत लग्न केलेलं. दोघांचा आता घटस्फोट झालाय. जास्त काळ त्यांचं नातं टिकलं नाही.