Share Market: प्रत्येक शेअरवर 35 रुपये डिव्हिडंड, डिफेन्स कंपनीचे मोठे गिफ्ट

Defence PSU Stock Dividend: या डिफेन्स सेक्टरमधील कंपनीने गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट दिलं आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना थेट 35 रुपयांचा लाभांश देणार आहे. या कंपनीने रेकॉर्ड तारीख पण जाहीर केली आहे. गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे.

| Updated on: Feb 12, 2026 | 5:16 PM
1 / 6
Defence PSU Stock Dividend: संरक्षण क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड HAL च्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड, लाभांशाचे गिफ्ट मिळाले आहे. कंपनीनुसार अंतरिम डिव्हिडंडची तारीख निश्चित करण्यात आली आहे. येत्या 18 फेब्रुवारी 2026 रोजी गुंतवूकदारांना लाभांश मिळेल.

Defence PSU Stock Dividend: संरक्षण क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड HAL च्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड, लाभांशाचे गिफ्ट मिळाले आहे. कंपनीनुसार अंतरिम डिव्हिडंडची तारीख निश्चित करण्यात आली आहे. येत्या 18 फेब्रुवारी 2026 रोजी गुंतवूकदारांना लाभांश मिळेल.

2 / 6

या तिमाहीत हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड HAL ने जवळपास 30 टक्क्यांचा वाढीव वार्षिक नफा नोंदवला आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या महसूलात 10.65 टक्क्यांची वार्षित वृद्धी नोंदवली. हा महसूल 7,698.80 कोटी रुपयांपर्यंत पोहचला.

3 / 6

कंपनीचा एबिटा वार्षिक आधारावर 30.5 टक्क्यांची वाढ झाली. ही रक्कम 1870.97 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 1433.21 कोटी होती. मार्जिन एक वर्षांपूर्वी 20 टक्क्यांहून वाढून 24 टक्के झाला आहे. सरकारी कंपनीची घौडदोड जोमात सुरू आहे. मागील वर्षीच्या बजेटपूर्वी पंतप्रधानांनी सरकारी कंपन्यांच्या कामगिरीविषयी मोठे भाकीत केले होते.

4 / 6

हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड HAL च्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2026 साठी डिव्हिडंडची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की 5 रुपयांच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर 35 रुपयांचे अंतरिम डिव्हिडंडची घोषणा करण्यात आली आहे. डिव्हिडंडची तारीख निश्चित आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी गुंतवूकदारांना लाभांश मिळेल.

5 / 6

14 मार्च 2026 रोजी पूर्वी पात्र शेअरधारकांच्या खात्यात लाभांशची रक्कम जमा होईल. विशेष म्हणजे 28 मार्च 2019 रोजीपासून कंपनीने आतापर्यंत 14 वेळा डिव्हिडंड दिला आहे. गेल्या वर्षी कंपनीने गुंतवणूकदारांना 15 रुपयांचा लाभांश दिला होता. आता कंपनी 35 रुपयांचा लाभांश देण्यात आला.

6 / 6

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us