
दिल्ली लाल किल्ला स्फोटाचा तपास आता एनआयएकडून केला जात आहे. एनआयए या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत. आय20 कारमध्येच हा स्फोट घडवून आणण्यात आला, असे समोर आलेले आहे.

असे असतानाच तपास संस्थांचे लक्ष एका आगळ्यावेगळ्या गोष्टीने वेधून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार i20 कारसोबत आणखी एक लाल रंगाची फोर्डची इको स्पोर्ट्स ही कार होती, असे म्हटले जात आहे.

ही कार लाल रंगाची असून दिल्ली पोलिसांची पाच पथकं या कारचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सर्वच पोलीस स्टेशन, बॉर्डर चेगिंग, चेक पॉइंट वर लाल रंगाच्या कारचा शोध घेण्याचा आदेश काढलेला आहे.

i20 कारच्या मदतीने पोलिसांनी आतापर्यंत पाच डॉक्टरांना अटक केली आहे. या डॉक्टरांची कसून चौकशी केली जात आहे. आता याच प्रकरणात लाल रंगाची फोर्ड काराचाही संदर्भ आल्याने पोलिसांना काही नवी माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस या लाल कारचा कसून शोध असून लवकरच ही कार पोलिसांना सापडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या शहरांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.