10 कोटी बजेट, नफा तब्बल 550 टक्के; मराठी चित्रपटाची जबरदस्त कामगिरी, थिएटर हाऊसफुल्ल!

'देऊळ बंद 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही दमदार कामगिरी करत असून काही शहरांमधील शोज हाऊसफुल्ल होत आहेत. हा चित्रपट लवकरच 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट बनेल, असं चित्र दिसतंय.

| Updated on: Jun 15, 2026 | 8:05 AM
1 / 6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या तुफान यशानंतर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता जवळपास एक महिना पूर्ण होत आला आहे. प्रदर्शनापासून आतापर्यंत या चित्रपटाने जबरदस्त नफा कमावला आहे.

2 / 6
'देऊळ बंद 2' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 23 व्या दिवशी 1.27 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 22 व्या दिवसाच्या तुलनेत या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 49 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. शुक्रवारी म्हणजेच 22 व्या दिवशी या चित्रपटाने 85 लाख रुपये कमावले होते. आतापर्यंत या चित्रपटाच्या नेट कलेक्शनचा आकडा 65.02 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

3 / 6
'देऊळ बंद 2' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमाकांवर अजूनही रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक चित्रपट आहे. 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 30.2 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यातील कमाई 22.4 कोटी रुपये झाली होती. तिसऱ्या आठवड्यात हा आकडा 11.15 कोटी रुपयांवर पोहोचला होता.

4 / 6
'देऊळ बंद 2' हा चित्रपट 2026 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला असून या चित्रपटाचा बजेट फक्त दहा कोटी रुपये असल्याचं कळतंय. दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 65.02 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच या चित्रपटाने एकूण 550% नफा कमावला आहे.

5 / 6
नफा कमावण्याच्या बाबतीत हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. मराठी शाळांवर आधारित या चित्रपटाने तब्बल 583.75 टक्के नफा कमावला होता. 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी 3.98 कोटी रुपयांची गरज आहे.

6 / 6
2026 या वर्षात सर्वाधिक नफा कमावण्याच्या बाबतीत 'अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई' हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 टक्के नफा कमावला आहे.

Follow Us