उदयोन्मुख स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत धर्मेंद्र प्रधान यांची गोलमेज बैठक, AI तंत्रज्ञानावर चर्चा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी दिल्ली येथे 10 उदयोन्मुख स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत इडीटेक एआय राऊंडटेबल बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या कार्यक्रमाला शिक्षण व ईशान्य भारत विकास राज्यमंत्री सुकांता मजुमदार तसेच शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री जयंत चौधरी यांची देखील उपस्थिती होती.

| Updated on: Feb 11, 2026 | 8:09 PM
1 / 5
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी दिल्ली येथे 10 नवउदयोन्मुख स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत इडीटेक एआय राऊंडटेबल बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या कार्यक्रमाला शिक्षण व ईशान्य भारत विकास राज्यमंत्री सुकांता मजुमदार तसेच शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री जयंत चौधरी यांची देखील उपस्थिती होती.

2 / 5
या बैठकीमध्ये धोरणनिर्माते, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उद्योजक एकत्र आले होते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या उद्दिष्टांनुसार भारताच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कशी प्रभावीपणे वापरता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

3 / 5
शिक्षण मंत्रालयाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतेचा उपयोग करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांच्या मालिकेचा हा एक भाग आहे. या बैठकीमध्ये एआय संदर्भात अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.

4 / 5
या राऊंडटेबलमध्ये के-12 शिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारी, कौशल्यवृद्धी (अपस्किलिंग), भाषा शिक्षण आणि कौशल्य शिक्षण या क्षेत्रांत एआय-आधारित (AI-first) उपाय विकसित करणाऱ्या नव्या पिढीतील भारतीय इडीटेक स्टार्टअप्सचे सादरीकरण करण्यात आले.

5 / 5
या बैठकीत सहभागी स्टार्टअप्समध्ये Arivihan, Fermi AI, Khare.AI, Seekho, SpeakX, SuperKalam, SuperNova, Vedantu, ConveGenius आणि Virohan यांचा समावेश होता. या बैठकीला प्रोसस ग्रुप भारत आणि आशियाचे प्रमुख  आशुतोष शर्मा, अरविहानचे सह-संस्थापक आणि सीईओ रितेश सिंग, सुपरनोव्हाचे सह-संस्थापक आणि सीईओ   महर्षी आर. बी., वेदांतूचे उत्पादन प्रमुख  पुलकित जैन, सिकोचे सह-संस्थापक आणि सीओओ कीर्तय अग्रवाल, विरोहनचे सह-संस्थापक आणि CTO कुणाल डुडेजा, सुपर कलामचे सह-संस्थापक आणि सीईओ विमलसिंह राठोड, फर्मी अलचे सह-संस्थापक, श्रीराम कृष्णमूर्ती, स्पीकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित मित्तल, खरे एआय क्लासेसचे संस्थापक आणि सीईओ असीम खरे आणि ConveGenius संस्थापक  धीरज भट्टाचार्य यांची उपस्थिती होती.