
हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या संपत्तीवरून जोरदार चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र हे जवळपास 450 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक होते.

धर्मेंद्र ज्या बंगल्यात राहायचे, तो बंगला त्यांनी खूपच कमी पैशांमध्ये खरेदी केला होता. आता त्यांची किंमत गगनाला भिडली आहे. सध्या धर्मेंद्र यांच्या बंगल्याची किंमत 100 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांच्याकडेही बरीच संपत्ती आहे. हेमा मालिनी या तब्बल 278 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. त्यांच्याकडे खंडाळ्याजवळ बिगरशेतजमीन आहे, ज्याची किंमत दोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

धर्मेंद्र यांच्याकडेही बिगरशेतजमीन असून त्याची किंमत नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं कळतंय. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, हेमा मालिनी यांच्याकडे एक घर असून त्याची किंमत जवळपास 111 कोटी रुपये आहे.

'माय नेता डॉट इन्फो' या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या नावावर मुंबईतील जुहू इथला एक बंगला आहे, जो त्यांनी 1,59,80,288 रुपयांमध्ये खरेदी केला होता. म्हणजेच जवळपास 1.59 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या या बंगल्याची आताची किंमत कितीतरी पटींनी वाढली आहे.

धर्मेंद्र यांचा हा बंगला मुंबईतील जुहू परिसरात असून तो 14,171 चौरस फूटांमध्ये पसरला आहे. या बंगल्याची आताची किंमत तब्बल 126 कोटी रुपये इतकी असल्याचं कळतंय.