Divyanka Tripathi Remarried: जुळ्या मुलांची आई दिव्यांका, 10 वर्षानंतर पुन्हा अडकली लग्नबंधनात! फोटो समोर
Divyanka Tripathi Remarried: 'ये है मोहब्बतें' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. फोटोमध्ये दिव्यांका नव्या नवरीच्या रुपात दिसत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्री असं देखील म्हणाली की, 'दुसऱ्यांदा लग्न केलं आहे...', तर जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण...

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री नव्या नवरीच्या भूमिकेत दिसत आहे.
सांगायचं झालं तर, दिव्यांका लवकरच 'पती पत्नी और पंगा 2' शोच्या येत्या एपिसोडमध्ये धम्माल करताना दिसणार आहे. शोमध्ये वेडिंग थीम ठेवण्यात आली असून, सर्व सेलिब्रिटी जोडप्यांनी त्यांचा वेडिंग लूक रि-क्रिएट केला.
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध कपल दिव्यांका आणि विवेक दहिया यांनी देखील त्यांचा वेडिंग लूक रिक्रेट केला. दोघांना नवरा - नवरीच्या लूकमध्ये पाहून चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला.
दिव्यांका आणि विवेक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी 16 जानेवारी 2016 मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर 8 जुलै 2016 मध्ये भोपाळ येथे लग्न केलं आणि 26 जुलै 2026 मध्ये जुळ्या मुलांचं जगात स्वागत केलं.
नव्या नवरा - नवरीच्या लूकमध्ये दिव्यांका आणि विवेक यांनी पापाराझींसाठी पोज देखील दिल्या. यावेळी अभिनेत्री म्हणाली, '10 वर्षात आमचं दुसरं लग्न होतं आहे...', सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
दिव्यांका आणि विवेक यांच्या जुळ्या मुलांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी शोमध्ये मुलांची एक झलक दाखवली. त्यांच्या गोंडस मुलांना पाहिल्यानंतर सर्वांना प्रचंड आनंद झाला. दिव्यांका कायम मुलांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.