lakshmi puja : लक्ष्मीपूजनादिवशी गुपचूपपणे करा हे उपाय, लक्ष्मी होईल प्रसन्न, घरात पैसा येईल चालून
दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीची कृपा मिळावी, घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे काही उपाय केल्याने तुमच्यावर माता लक्ष्मीचा आर्शिवाद कायम राहील. घरातील द्ररिद्रता, नकारात्मकता दूर होऊन पैशांची भरभराट होईल.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते असं म्हणतात. ज्याच्या पूजेने ती प्रसन्न होते त्या घरात ती वास करते. त्यामुळे या दिवशी प्रत्येक जण माता लक्क्षी आपल्यावर प्रसन्न व्हावी, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करतो. पण प्रार्थनेबरोबर काही छुपे उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते.
नाण्याचा उपाय: रात्री 12 ते 12.30 या वेळेत जवळपास पिंपळ, आवळा किंवा बेलपत्राचं झाड असेल, तर त्या झाडाखाली जाऊन घरी परतावं, त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी नमस्कार करून पूजेत ठेवलेलं एक रूपयांचं किंवा चांदीचं नाणं तिजोरीत अथवा कपाटात ठेवावं, त्यामुळे कर्जातून लवकर मुक्ती मिळते आणि घरात पैशांची भरभराट होते.
झाडूचा उपाय: दिवाळीच्या रात्री झोपण्यापूर्वी घरातील झाडूखाली एक रूपयांचं किंव चांदीचं नाणं ठेवण्याची मान्यता आहे. असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. अशी श्रद्धा आहे.
पाच अख्ख्या सुपाऱ्या : पाच अख्ख्या सुपाऱ्या, काळी हळद आणि पाच कवड्या घाव्यात या सर्व वस्तू गंगाजलने स्वच्छ करून लाल कपड्यात बांधाव्या. लक्ष्मीपूजनाच्या वेळी ही पूरचुंडी चांदीच्या ताटात किंवा वाटीत ठेवून देवीसोबत तिची पूजा करावी. दुसर्या दिवशी ही पुरचुंडी धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी.
गोमती चक्र : यासाठी पाच सुपाऱ्या, पाच हळदीच्या गाठी, पाच कवड्या आणि पाच गोमती चक्र लाल कपड्यात बांधून लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी ठेवावेत. पूजा झाल्यानंतर ही पूरचुंडी घराच्या उंबरठ्यावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधण्याची धार्मिक मान्यता आहे.
पिंपळाच्या झाडाच्या कुंकू : या उपायात दिवाळीच्या संध्याकाळी किंवा रात्री पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी कुंकू, दही आणि अख्खी उडीद डाळ ठेवून तिथे तुपाचा दिवा लावावा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते
शंख नाद : या उपायांशिवाय लक्ष्मीपूजनानंतर घरातील प्रत्येक खोलीत शंख आणि घंटा वाजवण्याचीही परंपरा सांगितली आहे. देवी लक्ष्मीसमोर गाईच्या तुपाचा सात किंवा नऊ वातींचा दिवा लावण्याचा उपायही आहे.
तसेच दिवाळीच्या रात्री लक्ष्मी मंत्र 108 वेळा जपावा. ॐ नमः भाग्यलक्ष्मी च विद्महे। अष्ट लक्ष्मी च धीमहि। तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्॥
वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टि करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.