
पेस्ट्री आणि डोनट्स: उठल्या उठल्या केक, पेस्ट्री, डोनट्स, बिस्किट्स खाणं ही सगळ्यात हानिकारक सवय आहे. होय, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात पौष्टिक पदार्थांनी करावी. बेकरी प्रॉडक्ट्स, मैदा असणारे पदार्थ पौष्टिक नसतात.

सँडविच: अनेकांना वाटतं सँडविच हे खूप आरोग्यदायी असतं. सँडविच मध्ये ब्रेडमुळे साखर असते, सोडियम असतं जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतं. ब्रेड खाल्ल्याने वजन वाढतं. दिवसाची सुरुवात सँडविचने करू नका. त्याऐवजी फळे खा.

दही: दही आरोग्यासाठी चांगले असते पण दही नाश्त्यामध्ये खाऊ नये. ते हवं तर दुपारच्या जेवणात असलं तरीही चालेल पण नाश्ता म्हणून दह्याची निवड करू नका. दह्यामध्ये साखर असते आणि दही फ्लेवर्ड सुद्धा असतं त्यामुळे ते आरोग्यासाठी नाश्त्यात पौष्टिक नसतं.

ब्रेकफास्ट बार: आता ब्रेकफास्ट बार म्हणजे काय? जाहिरातीमध्ये तुम्ही ब्रेकफास्ट बार नक्कीच पाहिले असतील. शेंगदाणे, काजू, बदाम ओट्स असे बरेच हेल्दी पदार्थ त्यात असतात पण सोबतच चव यावी म्हणून त्यात प्रचंड साखर असते. मग ही साखर कधी चॉकोलेटच्या स्वरूपात असते तर कधी इतर पदार्थांच्या. ब्रेकफास्ट बार ने दिवसाची सुरुवात करणे अत्यंत चुकीचं.

साखरयुक्त पॅकेज्ड फूड: तुम्हाला ते पदार्थ माहित आहेत का जे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध असतात. ते रंगीबेरंगी टॉफी सारखे दिसणारे? ओट्स म्हणा किंवा ते चोकोज, लहान मुलांसाठी खास बनवले जाणारे असे पदार्थ आता मोठ्यांसाठी पण उपलब्ध आहेत. यात अनेक फ्लेवर्स असतात. या फ्लेवर्समुळेच या पदार्थांमध्ये साखर असते. तुमच्या माहितीसाठी, दिवसाची सुरुवात कधीही साखर असलेल्या पदार्थांनी करू नये.