बिल गेट्सला चहा पाजणारा डॉली चहावाला आता देणार फ्रँचायझी, खर्च किती?

डॉली चहावाला आता आपल्या 'डॉली की टपरी' ब्रँडची फ्रँचायझी देत आहे. हँडकार्टपासून फ्लॅगशिप कॅफेपर्यंतच्या गुंतवणुकीच्या संधी आणि अर्जाच्या प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घ्या

| Updated on: Feb 01, 2026 | 4:09 PM
1 / 6
देशात सध्या स्टार्टअप्सची मोठी लाट आहे. सध्या खाद्य आणि पेय क्षेत्रात चहाच्या व्यवसायाने मोठी क्रांती घडवली आहे. एमबीए चहावाला आणि चाय सुट्टा बार यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या यशानंतर आता नागपूरचा प्रसिद्ध डॉली चहावाला (Dolly Ki Tapri) आपला विस्तार करण्यासाठी सज्ज झाला आहे.

देशात सध्या स्टार्टअप्सची मोठी लाट आहे. सध्या खाद्य आणि पेय क्षेत्रात चहाच्या व्यवसायाने मोठी क्रांती घडवली आहे. एमबीए चहावाला आणि चाय सुट्टा बार यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या यशानंतर आता नागपूरचा प्रसिद्ध डॉली चहावाला (Dolly Ki Tapri) आपला विस्तार करण्यासाठी सज्ज झाला आहे.

2 / 6

चहा देण्याच्या अनोख्या शैलीमुळे जगभरात प्रसिद्ध झालेला डॉलीने आता त्याच्या ब्रँडची फ्रँचायझी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपण ही फ्रँचायझी मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती घेणार आहोत.

3 / 6

सोशल मीडिया स्टार डॉलीने त्याच्या डॉली की टपरी या ब्रँडच्या विस्तारासाठी फ्रँचायझी मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे. डॉलीच्या मते, हा केवळ चहाचा ब्रँड नसून तो एक स्ट्रीट ब्रँ' म्हणून उदयास येत आहे. ज्यांना व्यवसायात काहीतरी वेगळे आणि मोठे करण्याची इच्छा आहे, अशा उद्योजकांसाठी ही मोठी संधी आहे.

4 / 6

डॉलीने विविध स्तरातील गुंतवणूकदारांसाठी तीन वेगळ्या श्रेणींमध्ये फ्रँचायझी मॉडेल्स सादर केली आहेत. यातील पहिले हँडकार्ट मॉडेल आहे. ज्यांना कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यासाठी अंदाजे ४.५ लाख ते ६ लाख खर्च अपेक्षित आहे.

5 / 6

त्यानंतर स्टोअर मॉडेल असून यात एका कायमस्वरूपी दुकानाच्या स्वरूपात हा व्यवसाय चालवला जाईल. यासाठी २० लाख ते २२ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. तर फ्लॅगशिप कॅफे हे सर्वात मोठे मॉडेल असून मोठ्या शहरांमधील प्रीमियम लोकेशन्ससाठी डिझाइन केले आहे. याची किंमत ३९ लाख ते ४३ लाख दरम्यान असू शकते.

6 / 6

या फ्रँचायझीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट https://dollychaifranchise.com/ वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जामध्ये वैयक्तिक माहिती आणि गुंतवणुकीची क्षमता नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांशी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधला जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us