रिकाम्यापोटी या बिया लिंबू पाण्यात मिक्स करून प्या, आतड्यांमधील घाण निघेल, वाढलेले वजनही कमी होईल..
अनेक जण दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून पितात. ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. यासोबतच या पाण्यात आरोग्यासाठी फायदेशीर बिया मिक्स करून प्या, ज्याचा तूफान फायदेशीर शरीराला होतात.

आजकाल वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केली जातात. यासोबतच वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय केली जातात. जर दररोज सकाळी उठल्यानतंर रिकाम्या पोटी लिंबू पा्ण्यात खास बिया मिक्स करून पिल्याने असंख्य फायदे होतात.
कोमट पाण्यात एक चमचा चिया सीड्स मिक्स करून पिल्याने अनेक फायदे होतील. एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात लिंबाचा रस टाका. रात्रभर किंवा दहा मिनिटे या चिया चिड्स भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात मिक्स करा आणि लिंबू टाकून प्या.
यात भरपूर फायबर असते. यासोबतच पचनक्रिया अधिक चांगली होती. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना गॅस आणि पचनाच्या समस्या आहेत. त्यांच्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहे.
शिवाय वाढलेले वजनही झटपट कमी होते. चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने आपले पोट भरपूर काळ भरल्यासारखे राहते. लवकर भूकही लागत नाही. चयापचनची समस्या देखील दूर होते.
चिया सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, त्याचे प्रमाणातच सेवन करणे आरोग्यासाठी बरे आहे.चिया सीड्सचे अधिक सेवन केल्याने आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.