औषधे घेताना किती पाणी प्यायला पाहिजे? छोटी चूक पडेल महागात, तज्ज्ञ काय सांगतात?

औषध घेताना योग्य प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे. तुम्ही चुकीच्या गोळ्या खात असाल, तर त्रासदायक ठरू शकते.

| Updated on: Oct 01, 2026 | 6:33 PM
1 / 5
तुम्ही डॉक्टरांनी लिहून दिलेली औषध घेऊन आलात. पुढे जेवल्यानंतर गोळी घेताना योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. औषध घेताना काही चुका टाळायला पाहिजे. औषध घेताना किती पाणी प्यायला पाहिजे, जाणून घेऊयात.

तुम्ही डॉक्टरांनी लिहून दिलेली औषध घेऊन आलात. पुढे जेवल्यानंतर गोळी घेताना योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. औषध घेताना काही चुका टाळायला पाहिजे. औषध घेताना किती पाणी प्यायला पाहिजे, जाणून घेऊयात.

2 / 5

औषध घेताना योग्य प्रमाणात पाणी पिणे फायदेशीर असते. यामुळे गोळी पोटात सहज पोहोचण्यास सोपी जाते. आजारी व्यक्तींनी 60 मिली पेक्षा कमी पाणी प्यायला, तर गोळी घशात किंवा अन्ननलिकेत चिकटून जळजळ होण्याची शक्यता असते.

3 / 5

गोळी घेताना पाण्याऐवजी रस किंवा इतर थंड पेय पिणे टाळावे. गोळी घेताना इतर पेय घेणे हानिकारक ठरू शकते. तुम्ही दररोज विशेष औषध घेताना योग्य प्रमाणात पाणी प्या.

4 / 5

काही औषध घेतल्यानंतर तातडीने झोपणे त्रासदायक ठरू शकते. काही औषधे अन्ननलिकेत अडकून जळजळ किंवा इजा पोहोचवण्याची शक्यता असते.

5 / 5

औषधे घेताना दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे असते. औषध घेण्याआधी तारीख तपासून घ्यावी. शहर, गावातील चांगल्या मेडिकलमधून औषधे खरेदी करावीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us