AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता खानविलकरने दिली लेखी परीक्षा, वर्गात विद्यार्थ्यांसोबत बसून सोडवला पेपर; प्राजक्ता माळीची भन्नाट कमेंट

अमृताच्या या कृतीतून शिकण्याला वयाची मर्यादा नसते आणि स्वतःच्या आवडीसाठी कधीही नवीन सुरुवात करता येते, हा सुंदर संदेश मिळतो. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अमृता खानविलकरने दिली लेखी परीक्षा, वर्गात विद्यार्थ्यांसोबत बसून सोडवला पेपर; प्राजक्ता माळीची भन्नाट कमेंट
प्राजक्ता माळी, अमृता खानविलकरImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 16, 2026 | 1:48 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यासाठीही ओळखली जाते. तिच्या नृत्याची अदाकारी आणि ऊर्जा चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते. मात्र, यावेळी अमृता कोणत्याही चित्रपटातील डान्स किंवा रिएलिटी शोमुळे चर्चेत आलेली नाही. तर तिने दिलेल्या एका परीक्षेमुळे ती चर्चेत आली आहे. अमृताने चक्क कथ्थक नृत्याची लेखी परीक्षा दिली आहे. विशेष म्हणजे, इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वर्गात बाकावर बसून, हातात हॉलतिकीट आणि रोल नंबर घेऊन तिने हा पेपर सोडवला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कमेंटनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अमृताने शेअर केला परीक्षेचा खास व्हिडीओ

अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील खास क्षण, कामाचे अपडेट्स आणि वैयक्तिक अनुभव ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ती इतर विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसून कथकची लेखी परीक्षा देताना दिसत आहे. या पोस्टला तिने खास कॅप्शनही दिलं आहे. अमृता म्हणते, ‘स्वतःचा अभिमान वाटणारा आणखी एक दिवस… कथ्थकसाठी माझी लेखी परीक्षा. हा प्रवास पूर्णपणे वैयक्तिक आणि माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. काही वर्षांपूर्वी मी स्वतःला वचन दिलं होतं की केवळ माझ्या आनंदासाठी या मार्गावर चालायचं. कोणतीही घाई नाही, कोणतीही अट नाही, फक्त एकेक पाऊल पुढे टाकत राहायचं.’

पहा व्हिडीओ-

पुढे तिने सांगितलं की, इतर विद्यार्थ्यांसोबत बाकावर बसून, हातात हॉलतिकीट आणि रोल नंबर घेऊन, खिडकीजवळच्या जागेवर बसून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा अनुभव खूप छान होता. या प्रवासात साथ देणाऱ्या प्रिराशाचेही तिने आभार मानले आहेत.

प्राजक्ता माळीची कमेंट चर्चेत

अमृताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कमेंटने विशेष लक्ष वेधलं. प्राजक्ताने कमेंट करत लिहिलं, ‘Ohh MY MY… वेलकम टू द लीग, कसा गेला पेपर?’ यावर अमृतानेही मजेशीर उत्तर दिलं. ‘मस्त गेला पेपर’, असं तिने म्हटलं. दोघींच्या या संवादाला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

अभिनयासोबत कथ्थकचीही साधना

अमृताने याआधीही अनेकदा आपल्या नृत्यप्रेमाची झलक दाखवली आहे. 2023 मध्ये तिने ‘मुघल-ए-आझम’मधील ‘मोहे पनघट पे’ या गाण्यावर कथ्थक सादर केलं होतं. आता लेखी परीक्षा देण्याच्या तिच्या निर्णयामुळे ती केवळ नृत्य सादर करण्यापुरती मर्यादित नसून त्याचा अभ्यासही मनापासून करत असल्याचं दिसत आहे.

Follow Us
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू