
धावपटू दुती चंदचे नाव क्रीडाविश्वात अपरिचित नाही. ट्रॅकवर धावून तिने भारताला अभिमान वाटावा अशा अनेक उत्कृष्ट कामगिऱ्या केल्या आहेत. मात्र दुती रनिंगच्या मैदानावरून आता थेट डान्सच्या स्टेजवर दिसून येणार आहे. तिचे नृत्य कौशल्य लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

टीव्ही वरील प्रसिद्ध शो 'झलक दिखला जा'मध्ये दुती सहभागी होणार आहे. ती तिची कोरिओग्राफर रवीनासोबत या शोमध्ये सहभागी होणार आहे. तिला उत्कृष्ट धावपटू म्हणूनही ओळखले जाते. याबरोबरच दुती आपल्या खेळाबरोबरच समलैंगिक संबंधाचा उघडपणे खुलासा केल्याने चर्चेत आली होती.

शोबद्दल बोलताना दुती म्हणाली, “मी वेगवेगळ्या नृत्यप्रकारांवर नृत्य करण्याचा आणि इतक्या मोठ्या कलाकारांशी स्पर्धा करण्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. एक खेळाडू म्हणून मला माझ्या मार्गात येणारी नवीन आव्हाने स्वीकारायला आवडतात.

दुती पुढे म्हणाली, 'मला थेट प्रेक्षकांसमोर परफॉर्म करण्याची सवय आहे, पण माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव असणार आहे. नवीन काहीही शिकणे सोपे नाही, परंतु माझ्या कोरिओग्राफरच्या मदतीने मी ते आव्हान म्हणून स्वीकारण्याचा आणि माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करेन.

या संधीसाठी ती खूप उत्साहित असल्याचे दुती म्हणाली. ती म्हणाली, 'मी त्याच्यासमोर परफॉर्म करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. मी कलर्सचा चॅनलची आभारी आहे की त्यांनी मला 'झलक दिखला जा' सारख्या शोमध्ये सामील होण्यासाठी योग्य मानले आणि माझ्यावर विश्वास ठेवला. मला आशा आहे की माझ्या या रोमांचक नवीन प्रवासात माझे चाहते आणि प्रेक्षक मला साथ देतील.