
कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर प्रथमच राज्यात मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दहीहंडी उत्सवांना भेट देऊन गोविदा पथकांचा उत्साह वाढवला

मागाठणे येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या तारामती चॅरिटेबल ट्रस्ट वतीने आयोजित दहीकाला महोत्सवाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी आयोजक आमदार प्रकाश सुर्वे, त्यांचे पुत्र राज सुर्वे, माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल मुकेश म्हात्रे उपस्थित होत्या

आमदार सुर्वे यांच्यावतीने मतदारसंघातील आदिवासी बाळगोपाळासाठी प्रोटिनयुक्त मिल्कबार मोफत देण्यात आले.