जगातील पहिला Kiss कोणी घेतला? चुंबनाचा किस्सा माहिती आहे का?

Evolution of Kissing: चारचौघात किस करणे, चुंबन घेणे आपल्या संस्कृतीला रुचत नाही. तरीही चित्रपट, मालिका, वेब सीरीजमध्ये बोल्डनेसचा तडका लागतोच. स्क्रीनवर चुंबनाचा वर्षाव दिसतो. पण पहिल्यांदा किस कोणी केला आणि कधी केला हे तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: Nov 27, 2025 | 2:44 PM
1 / 6
प्रेम व्यक्त करण्यासाठी अनावर भावनांना वाट मोकळी करुन देण्यासाठी आणि रोमान्समध्ये चुंबनाचा वर्षाव होतो. भारतीय संस्कृतीत खुलेआम किस करणे शिष्टाचाराला धरून नाही. चार भिंतीत तुम्हाला चुंबनाचा पाऊस पाडता येतो. पण चारचौघात हा आचरटपणा मानल्या जातो.

2 / 6
केवळ स्त्री-पुरुषच किस, चुंबन घेतात असा तुमचा समज असेल तर तो साफ खोटा आहे. कारण माकडांमध्ये, अस्वल, लांडगे आणि इतर काही प्राण्यांमध्ये ओठांची ही गुप्तगु होते. काही पक्षांमध्ये पण ओठांचा हा गोडवा चाखला जातो.

3 / 6
ऑक्सपर्ड विद्यापीठातील संशोधकांनी किसचा पार किस पाडला. चुंबणाची ही प्रथा कधीपासून सुरू झाली याच्या ते खोलात गेले. तर या अभ्यासानुसार, मानव आणि माकडांच्या पूर्वजांनी जवळपास 2 कोटी 10 लाख वर्षांपूर्वीच किस करण्याचे कसब आत्मसात केले. म्हणजे किस करण्याचा मक्ता हल्लीच्या पिढीकडे नसून तर रोमान्सचा हा किडा पूर्वजांपासून आलेला आहे.

4 / 6
नेअंडरथल्स हा मानवाचा फार प्राचीन नातेवाईक बरं का. तर हा देखील किस करण्यात तरबेज असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. म्हणजे जवळीकता, अनामिक भीती, व्यक्तीविषयी खास प्रेम व्यक्त करण्याची भावना या उत्क्रांत होत असलेल्या जीवामध्ये सुद्धा होती.

5 / 6
मानव आणि नेअंडरथल्स यांच्या लाळेमध्ये एक प्रकारचा सुक्ष्म जंतू आढळला आहे. तर लाळेच्या देवाण-घेवाणीतून प्रेम फुललेच नाहीतर पृथ्वीवरील मानव जातीचा मोठा पसारा वाढला. पुत्र असावा ऐसा गुंडा, ज्याच्या तीन लोकी झेंडा असे आपण ऐकलेच आहे. तर आपल्या पूर्वजांनी चुंबनाच्या माध्यमातून सातही खंडात मानव जात पोहचवली, बोला आता.

6 / 6
आता राहिला प्रश्न किस का करण्यात येते? तर बहुधा त्यामागे भावनिक नाळ जोडण्याचे प्रयत्न होत असावा. नाहीतर ओठ दाबण्यात आणि चावण्यात कुणाला इतका इंटरेस्ट असेल, नाही का? कारण त्यातून प्रजजन होत नाही. पण प्रणयाची सुरुवात आणि एकमेकांना मानसिक आधार यासाठी चुंबनाचा पायंडा पडला असावा.