Health Tips | ‘वर्क फ्रॉम होम’दरम्यान निरोगी आणि तंदुरुस्त राहायचंय? मग, ‘हे’ व्यायाम नक्की ट्राय करा!

| Updated on: May 17, 2021 | 2:30 PM

वर्क फ्रॉम होम दरम्यान स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण हे व्यायाम करू शकता. व्यायामामुळे केवळ प्रतिकारशक्ती मजबूत होत नाही तर आपले स्नायू आणि सांधे देखील मजबूत होतात.

1 / 6
हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग : स्ट्रेचिंग करून शरीर लवचिक होते. हा व्यायाम करण्यासाठी, आपले दोन्ही पाय समोर पसरा आणि आपल्या हातांनी पायाला स्पर्श करा. एकदा झाल्यावर परत पहिल्या टप्प्यावर या. हा व्यायाम सुमारे 10 वेळा करा.

2 / 6
फुलपाखरू पवित्रा : फुलपाखरू आसन करण्यासाठी, दोन्ही पाय सरळ समोर ठेऊन बसा. यानंतर, दोन्ही पायांच्या बोटांना, हाताच्या बोटांनी घट्ट पकडा.

3 / 6
स्पॉट जॉगिंग आणि स्किपींग : स्वत:ला तंदुरुस्त आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण स्किपिंग किंवा स्पॉट जॉगिंग देखील करू शकता.

4 / 6
चेअर स्क्वॉट्स आपल्या पाठीच्या खालच्या भागास आराम देतात. जर आपण हा व्यायाम प्रथमच करत असाल तर ‘बट’ला स्पर्श न करता खुर्चीवर बसा. असे केल्याने तुमचे आसन चांगले होईल.

5 / 6
शोल्डर रोल : आपल्या खांद्यांना विश्रांती देणे फार महत्वाचे आहे. यासाठी सरळ उभे रहा आणि गोलाकार हालचालीत आपला खांदा फिरवा. हा व्यायाम सुमारे 6 वेळा रिपीट करा. हा व्यायाम दररोज केल्यास तुम्हाला मानदुखीपासून आराम मिळेल.

6 / 6
शवासन : शवासनात हळू हळू दीर्घ श्वास घ्या. 10 मिनिटांचे कसरत सत्र संपल्यानंतर हे आसन करा. यामुळे आपल्या शरीराला आराम मिळेल.