
बिग बॉस 16 मध्ये अर्चना गौतम ही धमाका करताना दिसली. अर्चना गौतम ही कायमच चर्चेत असते. अर्चना गौतम ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

नुकताच अर्चना गौतम हिने मुंबईच्या अंधेरी भागामध्ये एक अत्यंत आलिशान असे घर खरेदी केली. अर्चना गौतम आणि वाद हे देखील बघायला नेहमीच मिळते.

एका मुलाखतीमध्ये अर्चना गौतम हिने सांगितले की, ज्यावेळी ती मुंबईमध्ये नवीन आली होती. त्यावेळी ती एका मोठ्या अभिनेत्रीला भेटली.

त्या अभिनेत्रीला अर्चना गौतम म्हणाली की, मी तुमची आणि तुमच्या मुलीची खूप जास्त चाहती आहे आणि मला तिच्यासारखी अभिनेत्री बनायचे आहे.

त्यावेळी ती अभिनेत्री थेट म्हणाली, तू माझ्या मुलीच्या चप्पलची देखीव बरोबरी करू शकत नाही. हे नेहमीच मनात राहिल्याचे देखील अर्चना हिने म्हटले. आज त्याच अर्चनाने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले.