
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

अमिताभ बच्चन यांचा आज 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस आहे. सकाळपासूनच चाहते हे अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

हजारोंच्या संख्येत अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते हे त्यांच्या घराबाहेर पोहोचले. जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन हे देखील जलवा बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी बिग बी हे चाहत्यांचे आभार मानताना देखील दिसले.

अमिताभ बच्चन यांना पाहून चाहतेही आवाज देताना दिसले. अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे.