
हिवाळा अनेकदा शेतीला कमी पाणी लागतं, परंतु एकदा उन्हाळा सुरू झाली त्या पिकांना गरजेनुसार पाणी लागत असतं.

तसेच पिकाला वेळच्यावेळी पाणी नाही मिळालं तर त्या पिकाचं मोठ नुकसान होण्याची होण्याची शक्यता असते. सध्या जालना जिल्ह्यात असा प्रकार सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्ते पोखरी गावातील शेतक-यांनी महावितरण कंपनीकडून शेतीच्या पंपासाठी वीज पुरवठा होत नसल्याने आंदोलन केले आहे. हे आंदोलन फक्त शेतीच्या पंपाला वीज सुरळीत व्हावी म्हणून करण्यात आल्याचं समजतंय.

शेतक-यांनी जवळ असलेल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव घातला होता. त्यामुळे तिथं असणारे अधिकारी भयभीत झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला उदरनिर्वाह शेतीवरती केला. तसेच अनेकांचे जॉब गेल्याने अनेकांनी शेतीची कास धरली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले.