
सदर आगीची भीषणता पाहता या आगीमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा देखील तर्क लावण्यात येत आहे.

सदर घटनेची माहिती अकोला अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले. पण आगीची तीव्रता पाहता अकोल्यातील अग्निशामक दलाचे बंब अपुरे पडत होते. पातूर बाळापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गोडाऊन हे स्पेअर पार्टचे असल्याने त्यात ऑइल साठादेखील ठेवण्यात आला होता. सदर आगीमध्ये ऑईलने देखील पेट घेतल्याने आगीची तीव्रता देखील वाढली.

गीतानगर बायपासजवळ अहमद कॉलनी येथे इमरान अहमद नौशाद यांचे हिंदुस्थान मोटर्स नावाने स्पेअर पार्टचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये स्पेअर पार्ट ऑइल व इतर साहित्याला आज पहाटे सहाच्या सुमारास अचानक आग लागली.

आज सकाळच्या सुमारास जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गीतानगर स्थित हिंदुस्थान मोटर्सच्या गोडाऊनला पहाटेच्या दरम्यान भीषण आग लागली. पहाटे लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या किमान 30 गाड्या लागल्या.