प्रसिद्ध निर्मात्याचं काय झालं? विमान अपघाताच्या 3 दिवसानंतरही बेपत्ता, पत्नीचा धक्कादायक दावा काय?

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातानंतर गुजराती चित्रपट निर्माते महेश जिरावाला बेपत्ता आहेत. आता त्यांच्या पत्नीने धक्कादायक दावा केला आहे.

| Updated on: Jun 16, 2025 | 6:05 PM
1 / 7
12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. या विमानात असलेल्या 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृ्त्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली.

2 / 7
अहमदाबादमधील विमान अपघातानंतर आतापर्यंत 87 मृतदेहांचे डीएनए मॅचिंग करण्यात आले आहे. ज्या मृतदेहांचे डीएनए मॅचिंग झाले आहे ते कुटुंबियांना देण्यात आले आहेत. तसेच त्यांना मृत्यु प्रमाणपत्रे देखील देण्यात आली आहेत.

3 / 7
धक्कादायक बाब म्हणजे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर गुजराती चित्रपट निर्माते महेश जिरावाला अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्या पत्नीचे म्हणणे आहे की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महेशचाही समावेश असू शकतो.

4 / 7
महेश जिरावाला हे नरोडा येथील रहिवासी आहेत. महेश हे जाहिरातींचे व्हिडिओ बनवण्यासोबतच संगीत व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कॉकटेल प्रेमी पाग ऑफ रिव्हेंज' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.

5 / 7
महेश यांच्या पत्नीने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, "माझ्या पतीने मला दुपारी 1.14 वाजता फोन केला आणि सांगितले की आता माझी बैठक संपली आहे आणि ते घरी येत आहेत. मात्र ते परतले नाहीत. मी याबाबत पोलिसांना सांगितले तेव्हा असे आढळले की, त्यांच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळापासून 700 मीटर अंतरावर होते."

6 / 7
एअर इंडियाच्या अपघातानंतर महेश बेपत्ता आहेत. त्यांचे शेवटचे लोकेशन अपघातस्थळाजवळ होते,  त्यामुळे त्यांचाही या अपघात मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.

7 / 7
चित्रपट निर्माते महेश यांची पत्नी म्हणाली की, "विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महेश असू शकतात. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्ही डीएनए नमुने देखील दिले आहेत."