
डाळींबाचे सेवन : जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर ती भरून काढण्यासाठी डाळींब हे अंत्यंत उपयुक्त असे फळ आहे. शरीरात रक्त वाढवण्यासाठी दररोज एक डाळींब खावे किंवा डाळींबाचे ज्यूस प्यावे. काही दिवसांमध्येच तुमच्या शरीरातील रक्त वाढते.

पालक : पालकामध्ये मोठ्याप्रमाणत लोह असते. लोह हे रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान करते. तसेच पालकामध्ये इतर देखील अनेक पोष्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

जांब : जांबामध्ये देखील लोह मोठ्याप्रमाणात असते. लोहामुळे तुमच्या शरीरातील रक्त निर्मितीची प्रक्रिया अधिक गतीमान होते. त्यामुळे गर्भवती महिलांना जांब खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

बिट : बिटमध्ये मोठ्याप्रमाणात पोषण तत्वे असतात. बिटला व्हिटॅमिनची खान मानले जाते. तुम्ही बिट कच्चे, सूप बनवून, अथवा विविध पदार्थांमध्ये टाकून देखील खाऊ शकता. बिटमुळे तुमच्या शरीरामधील रक्ताचे प्रमाण वाढते.

मनुके : मनुक्यांमध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात. मनुक्यांच्या नियमित सेवनामुळे थकवा दूर होतो. तसेच रक्त वाढण्यासाठी देखील मनुक्याचे सेवन चांगले असते. टीप संबंधित माहिती ही सामान्यज्ञानाच्या हेतून देण्यात आली आहे. आपला डायट प्लॅन ठरवण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.