चकल्या तेलात फुटू नयेत आणि कुरुम कुरुम होण्यासाठी नक्की फॉलो करा या टिप्स..
चलकी म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चकली खाल्ल्याने तोंडाची चवच बदलते. आपल्यापैकी अनेकांना चकली खाण्यास प्रचंड आवडते. दिवाळीत चकलीला विशेष महत्व आहे. पण कढईत चकली सोडली की, लगेचच विरघळते.

दिवाळी तोंडावर आहे. यातच अनेक घरात चकल्या केल्या जात आहेत. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी महिलांमध्ये मोठी धावपळ बघायला मिळतंय. त्यापद्धतीने त्यांची खरेदीही सुरू आहे.
अनेकदा चकल्या करताना तेलात चकली टाकली की, लगेचच तुटते आणि वरगळते. यामुळे चकल्या तर छान होतच नाहीत शिवाय तेलाच चकल्या तुटतात देखील. तेलात चकल्या फुटल्याने तेल खराब होते, शिवाय चकलीही चांगली राहत नाही.
पिठात तेल किंवा तूप जास्त झाले तरीही चकल्या तेलाच सोडल्यानंतर विरघळतात. 1 किलो भाजणीच्या पिठात साधारणपणे 3 ते 4 मोठे चमचे गरम तेल पुरेसे असते. ते टाका आणि मिक्स करून घ्या.
भाजणीचे पीठ मिळण्यासाठी कायमच कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पीठ चांगले मळण्यास मदत होईल. जास्त कडक पीठ होणार नाही. ते व्यवस्थितपणे चकल्या होतील.
पीठ खूप जास्त गच्च मळले की, तेलात सोडताना समस्या येतील. जर जास्त मऊ मळले तर चकल्या तेलात सोडताच विरघळतील. पीठ अति मऊ मळू नका.