भारताशी संबंध बिघडवण्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा स्वार्थ? अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ!

अमेरिकेचे राजदूत राहिलेल्या एका बड्या व्यक्तीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानसोबत अमेरिकेने का जवळीक वाढवली, याचेही उत्तर त्यांनी दिले आहे.

Updated on: Oct 16, 2025 | 9:23 PM
1 / 5
 गेल्या वर्षभरात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले आहेत. टॅरिफमुळे तर ते जास्त ताणले गेले. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत जवळीक वाढवली आहे. याच कारणामुळे आता अमेरिकेच्या माजी राजदूताने ट्रम्प यांना चांगलेच सुनावले आहे.

2 / 5
अमेरिकेचे राजदूत राहिलेले राहम एमॅन्यूएल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणावर सडूकन टीक केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ट्रम्प यांच्या अहंकारामुळेच खराब झाले आहेत, असा आरोप राहम यांनी केला आहे.

3 / 5
सोबतच पाकिस्तानकडून मिळणाऱ्याक काही पैशांसाठी ट्रम्प यांनी भारतासोबतचे संबंध खराब करून टाकले, असेही ते म्हणाले. ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपामुळे तर एकच खळबळ उडाली आहे.

4 / 5
चीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेला भारताचा चांगला उपयोग होत होता. मात्र भारतासोबतचे संबंध खराब करून ट्रम्प यांनी 40 वर्षांपासूनची योजना आणि संबंध यांना नेस्तनाबूत करून टाकलं, असंह राहम एमॅन्यूएल म्हणाले आहेत.

5 / 5
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्यास समर्थन न दिल्याने ट्रम्प यांनी भारतासोबत संबंध खराब करायला सुरुवात केली, असाही आरोप एमॅन्यूएल यांनी केला आहे. त्यामुळे आता अमेरिकन सरकार यावर या आरोपांची दखल घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.