ही चार झाडे सापांचे माहेरघर, घराच्या जवळपास असल्यास लगेच करा पर्याय, उन्हाळ्यात साप घेता आसरा

जगभरात साप विविध भागांत आढळतात. सापांनी चाव घेतल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. उन्हाळ्यात तापमानात वाढ होते. त्यामुळे साप थंड जागेचा शोध घेत असतात. ही झाडे सापांना आकर्षित करतात? या झाडांमुळे सापांना लपण्यासाठी जागा मिळते. कोणती आहेत ही झाडे जाणून घेऊ या...

| Updated on: Apr 05, 2025 | 10:04 AM
1 / 5
सर्पतज्ज्ञ महादेव पटेल सांगतात की, ज्या ठिकाणी त्यांना आराम, सावली आणि सुरक्षितता मिळते त्या ठिकाणी साप जास्त दिसतात. कडक सूर्यप्रकाश आणि उष्णता टाळण्यासाठी ते थंड, दमट आणि सावलीची ठिकाणे शोधत असतात. यामुळे काही झाडांजवळ सापही दिसतात.

2 / 5
गोकर्णी हे झाड निळ्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. पण ते सापांना खूप आवडते. त्याच्या वेली आणि दाट पाने सापांसाठी लपण्याची जागा आहेत. त्यामुळे गोकर्णी घराजवळ लावणे टाळा.

3 / 5
निंबूचे झाडसुद्धा सापांना आकर्षित करते. या झाडाच्या पानांमध्ये साप सहज लपू शकतो. तुमच्या बागेत निंबूचे झाड असल्यास त्याची छाटनी नियमित करा.

4 / 5
चंपा हे सुंगधीत फुल असणारे झाड आहे. तिच्या सुवासिक फुलांमुळे ते आकर्षित करते. परंतु तिच्या फांद्या आणि पाने सापांसाठी योग्य लपण्याची जागा देतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा बागेजवळ लावू नका.

5 / 5
मोकळ्या रानावर, रस्त्यांच्या कडेला, कुंपणाजवळ वाढणारी हिरवट बसकट रंगीबेरंगी झुडुप म्हणजे घाणेरी किंवा लँटाना. या झाडाच्या चमकदार फुलांमुळे साप आकर्षत होतो. सापांना हे खूप आवडते. त्याची दाट पाने आणि लहान फळे सापांना लपण्यासाठी आणि खाण्यासाठी जागा देतात. यामुळे हे झाड घराच्या आजूबाजूला असल्यास काढून टाकणे सुरक्षित आहे.