रुसलेल्या मित्राला मनवायचंय? मग हे गाणं त्याला पाठवा, क्षणात दूर होईल रुसवा, ऐकदा ऐकलं तरी..
नाराज झालेल्या मित्राला जर तुम्हाला मनवायचे असेल तर हे गाणं त्याला एकदा ऐकवा. काही क्षणात नाराजगी होईल दूर. मैत्री होईल घट्ट. अनेक वर्षांपासून मैत्रीवर आधारित हे गाणं प्रचंड सुपरहिट.

2 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील 'तेरा यार हूं मैं' हे गाणं पुन्हा चर्चेत आलं आहे. नाराज झालेल्या मित्राची समजूत काढण्यासाठी आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हे गाणं आजही अनेकांचे आवडते ठरते.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटात कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सनी सिंह आणि सोनाली सेगल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मैत्री आणि प्रेम यांवर आधारित या चित्रपटातील 'तेरा यार हूं मैं' हे गाणं गीतकार कुमार यांनी लिहिले असून संगीत रोचक कोहली यांनी दिले आहे. गायक अरिजीत सिंह यांच्या भावपूर्ण आवाजामुळे हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले.

प्रदर्शनानंतर जवळपास आठ वर्षे उलटूनही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. यूट्यूबवर या गाण्याला सुमारे 41.8 कोटी व्ह्यूज मिळाले असून मित्रांच्या लग्नसमारंभ, पार्ट्या आणि शाळा-महाविद्यालयांच्या कार्यक्रमांमध्ये हे गाणं आजही आवर्जून वाजवले जाते.

अनेकजण आपल्या जिवलग मित्राला हे गाणं समर्पित करून मैत्रीचे नाते अधिक घट्ट असल्याची भावना व्यक्त करतात. मैत्री, प्रेम आणि भावनिक नात्यांचे सुंदर चित्रण करणारा हा चित्रपट आणि त्यातील 'तेरा यार हूं मैं' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे.