
मुंबई, महाराष्ट्रच नाही, तर देशात 'लालबागच्या राजा'ची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक लालबागला येतात.

'लालबागचा राजा' हे मुंबईतील जुनं गणेशमंडळ आहे. दरवर्षी विक्रमी संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचत असतात. बाप्पाच भव्य रुप डोळ्यात साठवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.

अनेक जण मनोकामना पूर्ण झाली म्हणून नवस फेडण्यासाठी तर अनेक मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून दर्शनासाठी येतात. या गणपतीच्या दर्शनाला पहिल्या दिवसापासून गर्दी असते.

लालबागच्या राजाच्या मंडपात मोठी गजबज आहे. सर्वत्र शिट्ट्यांचे आवाज ऐकू येत आहेत. कालपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.

लालबाग नगरीत उत्साहाच वातावरण आहे. करीरोड, लोअर परेल रेल्वे स्थानकात सकाळपासूनच लगबग आहे. भक्तगण मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत.