
आज अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन! आज लाखो भाविक गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप देतात. पुणे, मुंबईत मोठ्या थाटामाटात गणपती विसर्जन केलं जातं. गणपतीच्या आगमनाचे जितके महत्त्व आहे तितकेच गणपती विसर्जनाचे महत्त्व आहे. चला तर मग बघुयात मुंबईत कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्ही विसर्जन बघू शकता.

बांद्रा: बँडस्टँड प्रोमिनेड, बांद्रामध्ये गणपती विसर्जन एकदम जोशात असतं. इथे खूप अभिनेते, अभिनेत्री विसर्जनात सहभागी होतात. बँडस्टँड ही जागा मुंबईतली सगळ्यात फेमस जागा आहे. या ठिकाणावर जाऊन तुम्ही जर विसर्जन पाहिलं तर तुम्हाला खूप चांगले दृश्य बघायला मिळतील.

जुहू बीच: आज बाप्पाला निरोप! जुहू बीचवर ढोल ताशांच्या गजरात इथे गणरायाला निरोप देतात. विसर्जन बघायला इथे गेलं की आनंदाचं वातावरण दिसतं.पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ किंवा खार स्थानकात उतरून लोकल बसने येथे पोहोचता येते.

वर्सोवा बीच: वर्सोवा बीच हा मुंबईमधील सगळ्यात साफ बीच पैकी एक आहे. इथे हजारो लोक गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला येतात. लाखोंच्या संख्येने इथे भाविक उपस्थित असतात. गगनचुंबी मूर्ती लोक बघतच बसतात.

पवई लेक: पवई तलाव हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. इथेही ढोल ताशे, गाणे, मोरया-मोरयाच्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातो. पवई तलावाच्या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते.