
सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांकडेच सध्या दिवाळी सेलिब्रेशन अगदी जोरदार सुरू आहे.

या सर्वांमध्ये आता एका मराठी सेलिब्रिटीचे दिवाळी लूक खास पाहण्यासारखा आहे. ती म्हणजे गौतमी पाटील

आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलने आता आपल्या सौंदर्यांनेही घायाळ केले आहे.

गौतमी पाटीलनेही दिवाळी जोरात साजरी केली आहे.

दिवाळीसाठी केलेल्या खास लूकचे फोटो गौतमीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनेरी रंगाची सुंदर साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, केसात गजरा अन् मोहक हसू, या रुपाने तिचे सौंदर्य अजूनच खुललेले पाहायला मिळते.

हातात दिवा घेऊन गौतमीने फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत

या फोटोंमध्ये गौतमी फारच सुंदर दिसत आहे.

"तुमच्या जीवनातील आनंद अफाट राहो. लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा", असं कॅप्शन गौतमीने फोटोंना दिलं आहे.