Gen Z चं शॉपिंगचं नवीन सीक्रेट समोर, खरेदीआधी जाणून घ्या हटके फंडा

Gen Z पिढीचं शॉपिंग सीक्रेट समोर आहे. त्यांचं खरेदीआधचा हटके फंडा उघड झालाय. जाणून घ्या त्यांची खरेदीची पद्धत

| Updated on: Sep 26, 2026 | 1:57 PM
1 / 5
आताची जेन-झी पिढी केवळ ट्रेंड किंवा जाहिराती पाहून खरेदी करत नाही.  उत्पादनाची गुणवत्ता, किंमत, ब्रँडवरील लोकांचा विश्वास पाहून तरुण पिढी वस्तू खरेदी करण्यावर भर देते. 'रुकम कॅपिटल'च्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे,

आताची जेन-झी पिढी केवळ ट्रेंड किंवा जाहिराती पाहून खरेदी करत नाही. उत्पादनाची गुणवत्ता, किंमत, ब्रँडवरील लोकांचा विश्वास पाहून तरुण पिढी वस्तू खरेदी करण्यावर भर देते. 'रुकम कॅपिटल'च्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे,

2 / 5

नव्या संशोधनानुसार, आताची नवी पिढी शॉपिंगसाठी तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करू लागली आहे. परंतु खरेदी करण्याचा अंतिम निर्णय स्वत:च्या हातात राखून ठेवत आहे.

3 / 5

82 टक्के Gen ग्राहक ब्रँडकडून प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेची अपेक्षा करतात. 51 टक्के जणांना गुणवत्ता महत्त्वाची वाटते. तर 49 टक्के जण किंमत पाहून खरेदीचा विचार करतात.

4 / 5

जेन-झी तरुणांची सणासुदीच्या काळात खरेदी वाढते. गिफ्ट देण्यात कुटुंबात आघाडीवर असतात. जेन-झीमधील 74 टक्के जण आई वडील आणि कुटुंबाच्या पसंतीला प्राधान्य देतात. सुणासुदीत 41 टक्के ऑनलाइन सर्चच्या माध्यमातून खरेदीचा विचार करतात. 30 टक्के जेन-झी स्वत:ला गिफ्ट देतात.

5 / 5

27 टक्के स्वत:च्या पसंतीनुसार वस्तू खरेदी करतात. 20 टक्के जण मित्रांच्या सल्ल्यानुसार वस्तू खरेदीवर भर देतात. काही जण सोशल मीडिया आणि क्रिएटर्सद्वारे मिळालेली माहिती जाणून घेण्यात 29 टक्के तरुणांचा वाटा आहे. तर 6 टक्के जण क्रिएटर्सच्या सुचनेनुसार वस्तूची खरेदी करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us