GK : मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते? हैराण करणारे उत्तर

Human Health : देशातील प्रत्येक भागात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. वाढलेल्या तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघताना दिसत आहेत. आज आप मानवी शरीर किती उष्णता सहन करू शकते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Apr 26, 2026 | 7:50 PM
1 / 5
आपल्या शरीराचे सामान्य तापमान साधारणपणे 37°C असते. तापमान वाढल्यास शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम तयार करते. मात्र बाहेरील तापमान खूप वाढल्यास शरीरासाठी स्वतःला नियंत्रित ठेवणे कठीण होते.

आपल्या शरीराचे सामान्य तापमान साधारणपणे 37°C असते. तापमान वाढल्यास शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी घाम तयार करते. मात्र बाहेरील तापमान खूप वाढल्यास शरीरासाठी स्वतःला नियंत्रित ठेवणे कठीण होते.

2 / 5

जेव्हा तापमान 40°C पेक्षा जास्त होते, तेव्हा शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागतो. जास्त वेळ प्रखर उन्हात राहिल्यास चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा जाणवणे आणि शरीरात जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 5

सुमारे 45°C तापमानात दीर्घकाळ राहिल्यास मानवी शरीरासाठी धोका वाढतो. जर शरीराचे अंतर्गत तापमान 40°C किंवा त्यापेक्षा जास्त झाले, तर ही परिस्थिती अत्यंत गंभीर ठरू शकते. यालाच हीटस्ट्रोक म्हणतात आणि ते जीवघेणेही ठरू शकते.

4 / 5

जेव्हा शरीराचे तापमान खूप वाढते आणि शरीर स्वतःला थंड करू शकत नाही, तेव्हा हीटस्ट्रोक होतो. याची लक्षणे म्हणजे, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी, उलटी, अशक्तपणा, खूप घाम येणे किंवा घाम न येणे आणि बेशुद्ध पडणे.

5 / 5

आपले शरीर मर्यादित प्रमाणातच उष्णता सहन करू शकते. 37 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंतची उष्णता शरीर काही प्रमाणात सहन करू शकते. त्यापेक्षा तापमान वाढल्यास धोका वाढतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us