GK : महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? उत्तर वाचून चकित व्हाल

Maharashtra State Flower : भारताचे राष्ट्रीय फूल कोणते असं विचारलं तर अनेकजण कमळ असे उत्तर देतील. मात्र महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? या प्रश्नाचे 99 टक्के लोकांकडे उत्तर असणार नाही. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.

| Updated on: Mar 08, 2026 | 9:41 PM
1 / 5
महाराष्ट्राचे राज्यफूल : ताम्हण हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यफूल आहे. याला जारुल किंवा इंग्रजीमध्ये Pride of India असेही म्हणतात. जांभळट-गुलाबी रंगाची आकर्षक फुले, उंच झाड आणि पर्यावरणासाठी असलेले महत्त्व यामुळे या झाडाला विशेष स्थान आहे.

2 / 5
झाडाची ओळख : ताम्हण हे एक पानझडी झाड आहे. हे झाड साधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढू शकते. त्याची पाने मोठी, गुळगुळीत आणि हिरव्या रंगाची असतात. उन्हाळ्यात या झाडावर जांभळट गुलाबी फुले येतात.

3 / 5
फुलण्याचा काळ : ताम्हणाच्या झाडाला प्रामुख्याने एप्रिल ते जून या काळात फुले येतात. उन्हाळ्यात इतर झाडांवर फुले कमी असताना ताम्हण पूर्ण फुलांनी बहरलेले दिसते, त्यामुळे ते खूप आकर्षक वाटते.

4 / 5
आढळणारे प्रदेश : ताम्हणाचे झाड भारतातील अनेक भागांत आढळते. महाराष्ट्, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि ईशान्य भारतात हे झाड़ आढळते.  महाराष्ट्रात हे झाड रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये, शाळा-कॉलेज परिसरात आणि जंगलात लावलेले दिसते.

5 / 5
राज्यफूल म्हणून निवड का? : ताम्हणाला महाराष्ट्राचे राज्यफूल घोषित करण्यामागे काही कारणे आहेत. ती म्हणजे त्याची अत्यंत सुंदर आणि आकर्षक फुले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणारे झाड. पर्यावरणासाठी उपयुक्तता आणि राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक.

Follow Us