
पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आणि पर्यटन नगरी म्हणून लोणावळ्याची ओळख आहे. पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी पाऊल उचलले आहे. लोणावळ्यात ग्लास स्कायवॉक उभारण्यात येणार आहे.

निसर्गाचा आनंद घेताना पर्यटकांना थरार ही अनुभवायला मिळणार आहे. दोन हजार फूट दरीवरून चालण्याचा अन हवेतून झेपावण्याचा आनंद ग्लास स्कॉयवॉकच्या माध्यमातून मिळणार आहे. राज्य सरकारने या पर्यटन स्थळी ग्लास स्काय उभारण्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे.

लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे हा प्रकल्प उभारणार आहे. पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना ग्लास स्कायवॉकची योजना आहे. यासंदर्भातील अहवाल एका महिन्यात देण्याचे अजित पवार यांनी आदेश दिले आहे.

लोणावळा परिसरात निसर्ग संपदा चांगली आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी युवक, युवती आणि लहान मुले येतात. त्यांच्यासाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांची उभारणी करण्याचा प्रकल्प म्हणजे ग्लास स्काय वॉक आहे. शंभर कोटींचा हा प्रकल्प आहे.

लोणावळा येथील 4.84 हेक्टर परिसरात ग्लास स्काय वॉकचा प्रकल्प होणार आहे. झीप लाईनींगसारखे साहसी खेळ या ठिकाणी असणार आहे. तसेच फुड पार्क, ॲम्पी थीएटर, खुले जीम असणार आहे. प्रकल्प उभारताना पर्यावरणाची काळजी घेण्यात येणार आहे.