
सोने-चांदीचा भाव काय

जळगाव सराफा बाजारात सोन्याचे दर ४५० रुपये, तर चांदीचे दर १६०० रुपयांनी घसरला. यापूर्वी बाजारात दोन्ही धातुत चढउताराचे सत्र दिसून आले. काही दिवसांपूर्वी या बाजारात दोन्ही धातुनी दरवाढीचा विक्रम केला होता.

ताज्या घडामोडीनुसार सोन्याचे दर ७९ हजार १५० रुपयांवर आले तर चांदीचे दर ९६ हजार ७०० रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे सराफा बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली. दिवाळीच्या काळात सोने खरेदी शुभ मानण्यात येते.

दिवाळीच्या इतर मुहूर्तावरही भाव कमी राहिल्यास ग्राहकांचा खरेदीचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. खरेदी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७८,२४५, २३ कॅरेट ७७,९३२, २२ कॅरेट सोने ७१,६७२ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५८,६८४ रुपये, १४ कॅरेट सोने ४५,७७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ९६,०८६ रुपये इतका आहे.

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात