Todays Gold Rate: सराफ बाजारात मोठे बदल! पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…
Todays Gold Rate: आज सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात मोठे बदल झाले आहेत. सोन्याचे भाव कोसळले आहेत. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. सणासुदीला तर अनेकांचा कल हा सोने आणि चांदी खरेदीकडे असतो. पण दोन्हीचे वाढते दर पाहाता सर्वसामान्यांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. आज सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे. चला जाणून घेऊया...
जळगावच्या सराफ बाजारात आज मोठे बदल झाले आहेत. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
आज 16 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 2 हजार 200 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव हे जीएसटीसह 1 लाख 38 हजार 535 रुपयांवर गेले आहेत.
चांदीच्या दरात देखील आज बदल झाले आहेत. एक किलो चांदीच्या दरात तब्बल 8 हजारांची घसरण झाली आहे. त्यानंतर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 77 हजार 160 रुपयांवर आले आहेत.
दिवाळीनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)