Groom Wedding Tradition : लग्नात नवरदेव पांढऱ्या रंगाच्या घोडीवर का बसतो? शास्त्रात काय म्हटलंय?
लग्नात नवरदेव पांढऱ्या रंगाच्या घोडीवर बसण्याची परंपरा आहे. लग्नात पांढऱ्या रंगाच्या घोडीवर बसण्याविषयी शास्त्रात काय म्हटलंय, जाणून घ्या

भारतीय लग्नात नवरदेव पांढऱ्या रंगाच्या घोडीवर बसण्याची परंपरा आहे. लग्नाच्या मंडपात येण्याआधी नवरदेवाची डॅशिंग एन्ट्री होते. ती देखील एका पांढऱ्या रंगाच्या घोडीवरून होते.
लग्नात पांढऱ्या रंगाच्या वरातीत घोडीवर बसण्याची खास परंपरा आहे. नवरदेव लग्नाच्या पोशाखात पांढऱ्या रंगाच्या घोडीवर बसतो. नवरदेवासोबत एक लहान मुलगा किंवा मुलगी देखील बसते.
रिपोर्टनुसार, घोड्याचा स्वभाव आक्रमक असतो. तर घोडीचा स्वभाव हा शांत असतो. घोडीला सांभाळणे सोपे जाते. लग्नात दुर्घटना, अपघात टाळण्यासाठी घोडीचा वापर केला जातो. घोडीवर बसण्याची परंपरा फार जुनी आहे.
घोडीवर बसण्याच्या विधीला वराच्या जबाबदारीचं प्रतिक म्हणून मानलं जातं. लग्नानंतर नवीन नातेसंबंध आणि कौटुंबिक जबाबदारा स्वीकाराव्या लागतात. त्याची सुरुवात म्हणून हा विधी केली जाते.
लग्नात पांढरा रंग हा शुभ आणि पवित्र मानला जातो. शास्त्रात पांढऱ्या घोडीला प्रेम, समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे लग्नात नवरदेवाला पांढऱ्या घोडीवर बसवलं जातं.