
राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. गुढीपाडव्याच्या खास प्रसंगी सर्वांनी ढोल-ताश्यांच्या गजरात नववर्षाचं स्वागत केलं आहे. अभिनेत्री धनश्रीने देखील काही फोटो पोस्ट केले आहेत.

धनश्रीने मराठमोळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठमोळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत धनश्री हिने सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धनश्री काडगांवकरनेही गुढीपाडवा सण दिमाखात साजरा केला आहे.

धनश्रीच्या नव्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धनश्री हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.