2025 सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, कमावले फक्त 1.78 कोटी, पण OTT येताच ठरला हिट

याला म्हणतात खरा 'धुरंधर'. 2025 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ठरला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट. पण OTT वर येताच रचला इतिहास. IMDb रेटिंग 7.8.

| Updated on: Jan 31, 2026 | 4:06 PM
1 / 6
कधी कधी एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाल दाखवू शकत नाही पण त्याची कथा आणि संगीत प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून बसतं. असाच काहीसा अनुभव 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमँटिक चित्रपट ‘गुस्ताख इश्क’बाबत पाहायला मिळतो आहे.

2 / 6
थिएटरमध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होताच त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

3 / 6
मात्र, पहिल्याच दिवशी केवळ 50 लाख रुपयांची कमाई करत या चित्रपटाची सुरुवात निराशाजनक ठरली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1.78 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले पण दुसऱ्या आठवड्यात ते घसरून अवघ्या 7 लाख रुपयांवर आले.

4 / 6
कोईमोईच्या रिपोर्टनुसार, सुमारे 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात फक्त 1.75 कोटी रुपयांची कमाई केली. ‘गुस्ताख इश्क’ला बॉक्स ऑफिसवर ‘फ्लॉप’ घोषित करण्यात आले.

5 / 6
थिएटरमध्ये अपयश आल्यावर 27 जानेवारी 2026 रोजी ‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट जिओहॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर येताच चित्रपटाला नवसंजीवनी मिळाली.  IMDb वर चित्रपटाला 7.8/10 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे.

6 / 6
दिग्दर्शक विभु पुरी यांनी OTTवरील प्रतिसादाबद्दल सांगितले की, 'प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. तर फातिमा सना शेख म्हणाली, हा चित्रपट माझ्यावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारा ठरला.