
अभिनेत्री मंदिरा बेदी व मौनी रॉय यांची जिगरी दोस्ती तर बॉलिवूडमध्ये जग जाहीर आहे. याबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमधूनही अनेकदा यांच्या दोस्तीची कल्पना अनेकदा चाहत्यांना येत असते

बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखलया जाणाऱ्या अभिनेत्री मंदिरा बंदीचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने मौनी रॉयने खास पोस्ट लिहीत मंदिरा बंदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मौनी ने ' तू माझी सर्वात मौल्यवान मैत्रीण, माझी बहीण, माझे कुटुंब बनली आहेस. मागील वर्ष तुझ्यासाठी अत्यंत काठीण होते. यामध्ये तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले.तरी तुला त्यातून अगदी फिनिक्स पक्षा सारखे उभे राहताना आम्ही पहिले आहे.

वीर व तारा तसेच सर्व मित्र- मैत्रीणीसाठी तु तुझ्या सर्वात मोठ्या दुःखाचे रूपानंतर प्रेमळ व दयाळूपणामध्ये बदलले. जे मी पाहिले आहे. असे मौनीने म्हटले आहे.

अंतर-बाह्य सुंदर असलेल्या या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजच्या दिवशी तू केवळ हास्य ,आनंदाश्रू तुझ्या डोळ्यात तरळू दे , शब्दात व्यक्त करता येत नाही त्याही पेक्षा अधिक प्रेम मी तुझ्यावर करते.