
बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) २५ फेब्रुवारी रोजी २९ वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करताना दिसत आहे. उत्तराखंड याठिकाणी उर्वशीचा जन्म झाला आहे. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. उर्वशी कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.


काही महिन्यांपूर्वी उर्वशीने केलेलं वक्तव्य तुफान व्हायरल झालं. तेव्हा उर्वशी म्हणाली होती की, ऋषभ पंत तिला भेटण्यासाठी आला होता. ऋषभ पंत याने प्रतीक्षा केली पण उर्वशी भेटू शकली नाही. या वक्तव्यानंतर ऋषभने पोस्टमध्ये लिहिलं, 'माझा पाठलाग करणं सोड..' पण त्याने पोस्ट लगेच डीलीट केली. तेव्हा देखील उर्वशी हिला ऋषभच्या नावामुळे प्रसिद्धी मिळाली.

एवढंच नाही तर, यानंतर उर्वशीने ऋषभ पंत याचा 'छोटू भैय्या' म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर उर्वशी जेव्हा ऑस्ट्रेलिया येथे सामना पाहाण्यासाठी पोहोचली होती. तेव्हा अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. जेव्हा ऋषभ पंत याचा अपघात झाला तेव्हा उर्वशीने पोस्टमध्ये 'प्रार्थना करत आहे...' असं लिहिलं होतं. तेव्हा देखील उर्वशी तुफान प्रसिद्धीझोतात आली.

दरम्यान, उर्वशी आणि ऋषभ यांच्यात कोणतही नातं नसलं, तर फक्त सोशल मीडिया पोस्टमुळे दोघे चर्चेत असतात. उर्वशी - ऋषभ यांच्यातील चर्चा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आल्या. उर्वशी कायम सोशल मीडियावर अशा पोस्ट करत असते, ज्यामुळे चाहते तिची पोस्ट ऋषभ पंत याच्यासोबत कनेक्ट करतात. तर उर्वशी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.