PHOTO | ‘हरयाणवी क्वीन’चे गुपचूप लग्न, सपना चौधरीच्या घरी चिमुकल्याचे आगमन!

सपना आणि बाळ दोघेही सुखरूप असून, चिमुकल्याच्या आगमनाने आपल्याला खूप आनंद झाल्याचे वीरने फेसबुकवर लाईव्ह येत सांगितले आहे.

Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 07, 2020 | 10:54 AM
1 / 8
हरियाणातील प्रसिद्ध गायिका सपना चौधरीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे.

हरियाणातील प्रसिद्ध गायिका सपना चौधरीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे.

2 / 8

पती वीर साहूने ही आनंदाची बातमी सगळ्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

3 / 8

सपना आणि बाळ दोघेही सुखरूप असून, चिमुकल्याच्या आगमनाने आपल्याला खूप आनंद झाल्याचे त्याने फेसबुकवर लाईव्ह येत सांगितले आहे.

4 / 8

सपना चौधरीने या वर्षाच्या सुरुवातीस, जानेवारी महिन्यात अभिनेता वीर साहूसह लग्नगाठ बांधली होती.

5 / 8

प्रेक्षकांमध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा होती. मात्र, दोघांनीही लग्न केल्याची बातमी गुलदस्त्यातच ठेवली होती.

6 / 8

सपनाचा पती वीर साहूसुद्धा हरियाणातील प्रसिद्ध अभिनेता आहे.

7 / 8

वीर साहू आणि सपना चौधरी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. जानेवारी महिन्यात त्यांनी लग्नदेखील उरकले होते. मात्र, कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्याने त्यांनी ही बातमी शेअर केली नव्हती, असे वीरने सांगितले.

8 / 8

वीरने शेअर केलेल्या या आनंदाच्या बातमीने सपना आणि त्याचे चाहते खुश झाले असून, दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us